नाईल
नाईल : आफ्रिकेतील व जगातील सर्वांत लांब (६,६५० किमी.) नदी. जलवाहनक्षेत्र ३३,४९,००० चौ. किमी. ती उत्तरवाहिनी असून भूमध्य समुद्रास मिळते. टांझानिया, बुरूंडी, रूआंडा, झाईरे, केन्या, युगांडा, सूदान, इथिओपिया व ईजिप्त यांचे काही प्रदेश नाईलच्या खोऱ्यात येतात.